दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
सिंभोरा ते मोर्शी रोडवरील घटना

मोर्शी /23 डिसेंबर : येथील सिंभोरा ते मोर्शी रोड दरम्यान आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोज मंगळवार ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या दुचाकी वाहनाच्या अपघातात दोघेजण घटनास्थळी ठार झाले असून दुचाकी चालक गंभीर जखमी अवस्थेत अमरावती येथे पुढील उपचारार्थ रवाना करण्यात आला आहे.
आर्वी येथील रहिवासी तमीजा बी रहमान शहा (80), त्यांचा मुलगा करीम शहा रहमान शहा (55) व नातू फारूक शाह करीम शाह (24) हे मोर्शी येथे आपल्या नातवाला पाहण्याकरता स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम एच 31 आर 3312 ने येत असताना सिंभोरा ते मोर्शी दरम्यान नशीदपूर शेतशिवारात त्यांच्या दुचाकी ला अपघात झाला तमीजाबी व करीम शाह या दोघांचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला व त्यांचा नातू फारूक याच्या पायाला गंभीर मार लागल्याने त्याला मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयातून प्रथमोपचारानंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झाले नसून मोर्शी पोलीस पुढील तपास करीत आहेत.




