जिल्ह्यात 55 टक्केपेक्षा जास्त जागेवर भाजपाची सत्ता

जिल्ह्यातील विजयी उमेदवारांचा एकच जल्लोष

* फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण

अमरावती /22 डिसेंबर : अमरावतीमध्येही भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवलाय. अमरावतीमधील 13 पैकी 6जागांवर भाजपला विजय मिळवलाय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र खातेही उघडता आलेले नाही. भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असून, बहुतांश नगरपरिषदांवर कमळ फुलले आहे. चिखलदरा आणि दर्यापूरमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फक्त 2 जागा आल्या आहे.
भाजपने शेंदूरजना घाट, धामणगाव आणि अचलपूर अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या जागांवर भाजपने निर्विवाद यश संपादन केले आहे. धामणगाव रेल्वे येथे भाजपने ’क्लीन स्वीप’ दिला आहे. नगराध्यक्षपदी अर्चना अडसड रोठे विजयी झाल्या असून, सर्वच्या सर्व 20 जागा जिंकून काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. अचलपूर जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या अचलपूर नगरपरिषदेत भाजपच्या रुपाली माथने यांनी 14,030 मतांच्या फरकाने एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला. शेंदूरजना घाट: नगराध्यक्षपदी सुवर्णा वरखेडे (भाजप) विजयी झाल्या आहेत. आणि नगरसेवक पदांसाठी भाजपने 11 जागेंवर बाजी मारली आहे. वरुड भाजपचे ईश्वर सलामे नगराध्यक्षपदी निवडून आले असून 18 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. अंजनगाव सुर्जी मध्ये भाजपचे अविनाश गायगोले नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. एकंदरीत अमरावती जिल्ह्यात जनतेने भाजपला मोठी पसंती दिली आहे. भाजपचे उमेदवार विजयी होताच भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी शेंदूर जना, घाट, वरुड आणि धामणगाव येथे विजयी रॅलीमध्ये सहभागी होऊन जल्लोष साजरा केला. यावेळी सर्वत्र गुलाल, फटाके आणि फुलांची उधळण तसेच जनतेचे अभूतपूर्व प्रेम पाहायला मिळाले. अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त जागा या भाजपच्या वाट्याला असून काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाला केवळ 2 जागेवरच समाधान मानावे लागले आहे. असे असताना नेहमी ईव्हीएम आणि मतचोरीचे आरोप करणार्‍या काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. अमरावती जिल्ह्यात 55 टक्केपेक्षा जास्त जागेवर भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. भारतीय जनता पार्टी हि आपल्या कर्तृत्वावर विजय मिळवणारी पार्टी आहे. त्यामध्ये कुठलाही गैरप्रकार करून विजय मिळविणे हे भाजपचे ध्येय नाही. जे काही यश मिळाले, ते फक्त कामाच्या आणि कर्तृत्वाच्या तसेच जनतेच्या विश्वासावर मिळाले आहे, त्याबद्दल आम्ही जनतेचे मनापासून आभारी आहे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button