डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त आजपासून व्याख्यानमालेचे आयोजन
आज मुक्तपत्रकार जयदीप हर्डीकर पहिले पुष्प गुंफणार

अमरावती /22 डिसेंबर : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषी विषयांवर आधारित ही व्याख्यानमाला दि.23, 24 आणि 26 डिसेंबरला मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात होईल. मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सायं. 5 वाजता व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख राहतील तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. नागपूर येथील अभ्यासक व मुक्तपत्रकार जयदीप हर्डीकर हे ‘ग्रामीण भारतातील सद्यःस्थिती व आव्हाने’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतील. या व्याख्यानाचे संयोजन डॉ.पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था विनिमय केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी केले आहे. या व्याख्यानमालेत बुधवार दि. 24 डिसेंबर 2025 ला सायंकाळी 5 वाजता अविनाश पाटील, अध्यक्ष, विकासनामा फाउंडेशन, धुळे यांचे ‘भारतीय संविधान व लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर सांयकाळी 5.00 व्याख्यान होईल.




