शेंदुरजनाघाटमध्ये भाजपाच्या सुवर्णा वरखडे यांचा विजय
आ.उमेश उर्फ चंदू यावलकर यांची यशस्वी खेळी

वरुड । 21 डिसेंबर – राजकीयदृष्टया संवेदनशिल समजल्या जाणार्या शेंदुरजनाघाट मध्ये विद्यमान आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले असून उमेदवार देतांना मोठया प्रमाणात नाराजीचा सूर ऐकू येत असतांना आणि अनेकांनी भाजपा उमेदवारांच्या विरोधात प्रचार आणि प्रसार करुन सुध्दा भारतीय जनता पार्टीने मिळविलेले यश अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. वरुड शहरात 26 पैकी 18 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे तर शेंदुरजनाघाट मध्ये 20 पैकी 11 नगरसेवक निवडून आले आहेत.
शेंदुरजनाघाट मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुवर्णा हरिभाऊ वरखडे या 5 हजार 808 मते घेऊन विजयी झाल्या तर द्वितीय क्रमांकाची मते शुभांगी संतोष धुर्वे यांना 4 हजार 211 मते प्राप्त झाली. इतर उमेदवारांमध्ये मिना श्रीराम कोकोडे (178), माला अजय कंगाले (172), प्रांजली कपील तरार (2329), करिश्मा शिकल धुर्वे (236) यांचा समावेश आहे. शेंदुरजनाघाट मधून प्रभाग क्र.1 भाजपाचे माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ पिंटू ज्ञानेश्वरराव सावरकर (651) व नीलिमा उमेश कुबडे (732), प्रभाग क्र.2 मधून भाजपाचे ओमप्रकाश रामचंद्र कांडलकर (553) व शितल सुनील होले (765), प्रभाग क्र.3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे बबलू उर्फ शेख नासिर शेख बशीर (1179) व कुरेशी जाकिया बानू मोहम्मद साहेब (1234), प्रभाग क्र.4 मधून भाजपाचे स्नेहल आकाश वघाळे (520) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे संदीप बाबा खडसे (538), प्रभाग क्र.5 मधून शिवसेनेचे प्रिया नेपाल पाटील (572) व विजय उर्फ योगेश श्रीधर चौधरी (542), प्रभाग क्र.6 मधून अपक्ष आशिष बाबाराव अढाऊ (306) व भाजपाच्या कुमुद किशोर अळसपुरे (524), प्रभाग क्र.7 मधून भाजपाचे हर्षल अशोक फुटाणे (669) व संगीता सतीश अकर्ते (768), प्रभाग क्र.8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे सुनिता कृष्णराव उईके (645) व इत्तेखार अहेमद इकबाल अहेमद (646) व प्रभाग क्र.9 मधून भाजपाच्या माधुरी कृष्णराव माहोरे (699) व पवन राजेंद्र मोघे (583), प्रभाग क्र.10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे राकेश माधवराव दवंडे (699) व भाजपच्या सुनिता जीवन वंजारी (559) यांचा विजय झाला. एकंदरीत शेंदुरजनाघाटमध्ये भाजपा 11, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गट 6, शिवसेना 2 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत प्रभाग 1 ब मधून भाजपा माजी गटनेता तथा अपक्ष उमेदवार विशाल प्रल्हादराव सावरकर यांना 385 मते, प्रभाग 2 अ मधून माजी नगरसेविका रेखा राजेंद्र आढाव यांना 446 मते, प्रभाग क्रमांक 2 ब मधून माजी नगरसेवक धनराज गोविंद अकर्ते यांना 224 मते, प्रभाग 3 अ मधून माजी नगरसेविका जया नितीन श्रीराव यांना 340 मते, प्रभाग 4 ब मधून माजी नगरसेवक लीलाधर वासुदेव कुवारे यांना 292 मते, प्रभाग क्रमांक 5 ब मधून माजी नगरसेवक भूपेंद्र तुकाराम कुवारे यांना 326 मते, प्रभाग क्रमांक 7 अ मधून माजी नगरसेवक संजय गुलाबराव डफरे यांना 525 मते, प्रभाग क्रमांक 10 अ मधून माजी नगराध्यक्ष रुपेश मांडवे यांना अवघे 274 मते प्राप्त झाली.




