तन्वी ढगे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अमरावती /20 डिसेंबर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या वतीने उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या समाजकार्य स्नातक परीक्षेत विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, अमरावतीची विद्यार्थ्यांनी कु. तन्वी विकासराव ढगे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नेत्रदीपक यश संपादन करीत समाजकार्य महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या संगाबा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये यशाची परंपरा कायम राखत सुयश संपादन केले.
या गुणवत्ता यादीमध्ये कु. तन्वी ढगे समाजकार्य स्नातक परीक्षेमध्ये सहावे स्थान पटकाविले आहे. या विद्यार्थिनीला विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारिणी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पुनम चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, प्रा. गजानन काळे व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.




