प्रलंबित अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना

अमरावती /19 डिसेंबर : राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत (महाआयटी) यांचेकडून विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन 2019-20 ते 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मोठया प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज सादर करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त माया केदार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केल्या आहेत.
महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार्‍या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीतील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. विविध स्तरावरील प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज विहित कालावधीत निकाली काढण्याबाबत शासन, आयुक्तालय, प्रादेशिक कार्यालय आणि जिल्हा कार्यालयामार्फत विद्यार्थी व महाविद्यालयांना अवगत करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा कार्यालयाकडून संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना वारंवार लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले आहे. तसेच सोशल मिडियाचे व वृत्तपत्रांमधून सुद्धा जाहीर आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2019-20 ते 2024-25 या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरिता सर्व राज्यांना दि.31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत दिलेली होती. तसेच सदरील मुदतवाढ दि.30 नोव्हेंबर, 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. तरी सुद्धा विद्यार्थी व महाविद्यालय यांचे कडून प्रलंबित अर्जाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.सन 2019-20 ते 2024-25 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले अर्ज सन 2018-19 प्रमाणे -वाळप कडून र्-ीीें ठशक्षशलीं करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शैक्षणिक वर्ष सन 2019-20 ते 2024-25 या कालावधीत महाडीबीटी प्रणालीवरील दि.15 डिसेंबर, पर्यंत प्रलंबित अर्जाची जिल्हानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button