आंतरराष्ट्रीय एआय परिषद ICAIISD’ 2025 चा उद्घाटन समारंभ

डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी यांचे डिजिटल हेल्थवर प्रभावी की-नोट भाषण

अमरावती /19 डिसेंबर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे आयोजितICAIISD’2025 – International Conference on AI Innovations for Societal Development  या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ दिनांक 19 डिसेंबर रोजी अत्यंत शिस्तबद्ध, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. देश-विदेशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे उद्घाटन सत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक संशोधन प्रवाह समजतात तसेच उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दुवा अधिक दृढ होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे श्री. समीर सावरकर यांनी एआय व डिजिटल हेल्थ क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव मांडत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी एआय आधारित निदान व स्क्रीनिंग तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘उत्पादन’ आणि ‘मार्केट-रेडी उत्पादन’ यातील फरक स्पष्ट करत, योग्य मार्गदर्शन व निधी उपलब्ध झाल्यास विद्यार्थी नवोन्मेषक प्रभावी स्टार्टअप्स उभारू शकतात, असे त्यांनी सांगितले.एसीएम नागपूर प्रोफेशनल चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. रविंद्र केसकर यांनी एआय आणि डेटा विश्लेषणाच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकला. केवळ मॉडेल तयार करणे नव्हे, तर सखोल निरीक्षण आणि विश्लेषण हे संशोधनाचे खरे बलस्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात एसीएमच्या सहकार्याने परिषद आयोजित करण्याची तसेच महाविद्यालयात एसीएम स्टुडंट चॅप्टर स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. डॉ. निरंजन जोशी यांनी नवोन्मेष व समाजविकास या संकल्पनांवर भर देत, अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जाणिवा विकसित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आरोग्य, कृषी आणि पर्यावरण क्षेत्रातील नवकल्पनांना मिळणार्‍या पाठबळाचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी इेेज्ञ ेष -लीीींरलीं चे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.परिषदेतील विशेष सत्रात प्रा. डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी (सीडीएस विभाग, आयआयएससी, बंगळुरू) यांनी डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्तेतील आव्हाने आणि भविष्यातील संधी यांवर प्रभावी की-नोट अ‍ॅड्रेस दिला. चार औद्योगिक क्रांती, ग्राहककेंद्रित जगतातील एआयची भूमिका, आरोग्य क्षेत्रातील अंमलबजावणीतील अडचणी, एज कम्प्युटिंग, नॉन-कम्युनिकेबल आजार आणि ‘थ्री डी’ संकल्पनेचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे मांडले. की-नोट सत्रानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. यलवर्थी यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल हेल्थ आणि एआयच्या भविष्यातील दिशेबाबत स्पष्टता मिळाली.कार्यक्रमाच्या शेवटी आयोजन समितीचे समन्वयक डॉ. शंतनु लोही यांनी सर्व मान्यवर, वक्ते, आयोजन समिती, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाची सांगता झाली.

संबंधित बातम्या

Back to top button