पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवास सुरुवात

अमरावती /17 डिसेंबर -पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाला आज सुरुवात झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी मा. अनिल इंगळे, उपायुक्त अमरावती महानगरपालिका डॉ. नरेंद्र वानखडे , शाळेचे प्राचार्य श्री सचिन दुर्गे व उपप्राचार्या सोनल निस्ताने यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा मशाल पेटवत उद्घाटन करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात विविध मैदानी खेळ विद्यार्थी खेळणार असून ज्यामध्ये रनिंग रेस, पोटॅटो रेस, लिंबू चमचा, सॅक रेस, बलून रेस, बास्केटबॉल, गोळा फेक, रस्सीखेच, लेझीम योगा असे विविध खेळांचे समावेश आहे. वर्ग नर्सरी ते दहावीचे चे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग आठवीचे विद्यार्थी आयुशी जयस्वाल, अनिमेष मोहोड, भूमी श्रीरामे, आर्यन अंबाडकर तसेच क्रीडा स्पर्धेच्या क्षेत्राची संचालन प्रवीण मेंढे सर यांनी केले व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button