आ. रवि राणा यांचा साई नगर प्रभागात विकास कामांचा धडाका

प्रभाग क्र. 19 साई नगर येथे सुनिल राणा यांच्या हस्ते 3 कोटी रु. विकास कामांचे भुमिपुजन

अमरावती /17 डिसेंबर – प्रभाग क्रमांक 19 साई नगर भागातील नागरिकांच्या मागण्या पुर्ण करत आ. रवि राणा यांच्या प्रयत्नातून तब्बल 3 कोटी रुपयांच्या विकास कामांना आज सुरुवात करण्यात आली. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनिल राणा यांच्या हस्ते या विकास कामांचे भव्य भूमिपूजन संपन्न झाले.
या विकासकामांमुळे साई नगर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होणार असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे दिलासा मिळणार आहे. प्रभागातील विविध वसाहतींमध्ये रस्ते बांधकाम, काँक्रिट नाले, ओपन जिम, सभागृह बांधकाम, तसेच सौंदर्यीकरणाचे अशी अनेक विकास कामे पुर्ण होणार आहेत. यामध्ये नितीन विहार, पुर्वा नगर, गुरुछाया कॉलनी, साने गुरुजी नगर, शिववैशाली कॉलनी, साहु नगर, फॉरेस्ट कॉलनी, नित्यानंद कॉलनी, शादानी नगर, तिरुपती नगर इ. परिसरातील रोड, काँक्रिट नाली, ओपन जिम, सभागृह बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या विकास कामांचा समावेश आहे. या भुमिपुजनाप्रसंगी बोलताना सुनिल राणा म्हणाले, साई नगर प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना आता गती मिळाली आहे. आ. रवि राणा यांच्या पाठपुराव्यामुळे हा संपूर्ण प्रभाग आधुनिक आणि सुबक होणार असून नागरिकांना उत्तम सुविधा मिळणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांचे स्वागत केले. अनेकांनी यामुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले. यावेळी साई नगर प्रभागातील सक्षम नेतृत्व सचिन भेंडे, उदय पर्वतकर, देवा शेंडे, किरण मुंधडा, आरती शेंडे, नरेश अतकरे, अमोल इंगळे, बाळु इंगाले, अल्का इंगोले, प्रशांत कावरे, सारिका पांडे, इखार सर, बोंडे काका व असंख्य नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button