मराठी शाळा क्र.7 च्या नवीन इमारतीचे आ.रवि राणा यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती /16 डिसेंबर : बेलपुरा परिसरातील महानगरपालिकेच्या हिंदी शाळा क्रमांक 03 व मराठी शाळा क्रमांक 07 यांच्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा आमदार रवि राणा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापण्यात आली व त्यानंतर आ. रवि राणा यांनी नवीन इमारतीचे औपचारिक लोकार्पण केले.
नवीन शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळणार असून परिसरातील शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होणार आहे. लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक, पालकवर्ग तसेच शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे माध्यम आहे. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आधुनिक शाळा इमारती व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. बेलपुरा येथील या नवीन शाळा इमारतीतून अनेक विद्यार्थी घडतील, अधिकारी, डॉक्टर, अभियंते बनतील आणि देशाचे नाव उज्वल करतील, असा मला विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करावे असे आ.रवि राणा यांनी बोलतांना सांगीतले. या कार्यक्रमास मा. नगरसेविका राधा कुरील, कुसुम साहु, किरण पातुरकर, सुधा तिवारी, सुनंदा बुरंगे, प्रीती बनारसे,ललित समदुरकर, स्वाती कुलकर्णी, लता देशमुख, गंगा खारकर यांच्यासह
मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, सहाय्यक अभियंता मंगेश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भुषण फरतोडे, संजय माहुलकर, छोटु आकोटकर, प्रिती रेवने, सुनिता राऊत, अण्णा कुभलकर, कुलदिप सराफ, सतनाम हुड्डा,सविन डाके, राजु मेटे, संतोष माहुरे, महेश राज, कमल मालविय, श्रीकांत धानोरकर, अंकित पाल, वहिद खॉ पठान, मंगेश कडु, योगेश पखाले, पंकज सपकाळ, योगेश चाटे, रत्नदिप नाईक, प्रविण वानखडे, प्रशांत नालसे, ज्योती बनसोड, चंचल दातीर, सुनिल हरणे, वंदना जामनेकर, निलेश शिरभाते, संतोष मावळे, सुभाष श्रीखंडे, सतिश हरणे, विलास माहुरकर, किशोर माहुरे यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते.




