श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जलतरणपटू वृषदा पाटील राष्ट्रीय स्तरावर

अमरावती /16 डिसेंबर : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरणपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करत अमरावतीचे नाव उज्वल केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दि. 16 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपन्न झाली. सदर स्पर्धेत वृषदा पाटिल ने 100 मीटर फ्री स्टाईल या स्पर्धा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून तिची महाराष्ट्र संघात शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धे करता निवड झाली. शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने दिल्ली येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव येथे दि. 12 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान संपन्न होत आहे. ती आपला जलतरणाचा नियमित सराव श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्विमिंग पूल वरती करते. या यशाचे श्रेय तिने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, अमरावती जलतरण संघटनेचे अध्यक्ष वसंतराव हरणे, प्रा. डॉ. टॉमी जोश, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रशिक्षक प्रा. डॉ. योगेश निर्मळ, तसेच मयूर कुमार व वैभवी थेटे यांना दिले आहे.




