मोर्शी येथे वृक्षाचे वाटप व वृक्षारोपण करून पर्यावरण विषयीची जनजागृती
दि बेस्ट पेट्रोल पंपचे संचालक नवीनकुमार पेठे यांचे आयोजन

मोर्शी /5 जून: दिवसेंदिवस वाढत असलेली वृक्षतोड पर्यावरणाचा होत असलेला र्हास व ग्लोबल वार्मिंगमुळे वाढत असलेले तापमान हा उदांत हेतू समोर ठेवून आपले सामाजिक दायित्व निभावनाच्या दृष्टीने येथील युवा उद्योजक तथा दि बेस्ट पेट्रोल पंपचे संचालक नवीनकुमार पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दि बेस्ट पेट्रोल पंप चांदूरबाजार रोड, मोर्शी येथे वृक्षाचे वाटप व वृक्षारोपण करून पर्यावरण विषयीची जनजागृती करून प्लॅस्टिक निर्मूलनाचा व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विनोद वानखडे, वनपरिक्षेत्राधिकारी अमोल चौधरी, सामाजिक वनीकरणाच्या वनपरिक्षेत्राधिकारी शितल धांडे,भारतीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष आगरकर, शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख,नरेश अंगणाणि, मुख्याधिकारी पराग वानखडे,जयदेवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा वृक्ष समिती सदस्य मिलिंद ढोले,शेखर चौधरी,शरद कनेर, अजय पाटील,संजय उल्ले,डॉ.गजानन पाटील,सोलवभाऊ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित अतिथीच्या हस्ते दि.बेस्ट पेट्रोल पंपाच्या ग्राहकांना घरात लावणार्या जांब,आंबा, जांभूळ,सीताफळांची फळझाडे शहरातील व बाहेर गावातील लोकांना भेट म्हणून देण्यात आले.दरम्यान त्यांनी वृक्षारोपणाचे काय महत्त्व आहे हे उपस्थित नागरिकांना पटवून दिले. कार्यक्रमाला शामल श्रीवास,हिमांशू मालवीय,रुपेश मेश्राम, राजेश मुंगसे,सागर पाटील,अनिल जावळे न्यू जनरेशन केअर फाउंडेशनचे अभय अकर्ते,मंगेश अकरते, आकाश भोंडे,प्रमोद शहाणे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जितू फंदे,अमोल पवार,शुभम पाटील,सागर साठवणे, निर्भय कठाळे,अशोक डहाके,प्रीतम कुंजेवार, हरीश ठाकूर,हर्षद खान, राजा भरते,सर्वेश नागले,ऋषिकेश गायकी,सागर इंगोले, रोशन पाटील,रोहित मालधुरे,स्वप्निल फंदे, शुभम भिवगडे, भरतसिंग राजपूत,संजू वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दि बेस्ट पेट्रोल पंपचे संचालक तथा युवा उद्योजक नवीनकुमार पेठे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष वाटप व वृक्ष रोपणाचा कार्यक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.