श्री हव्याप्र मंडळामध्ये अविस्मरणी ठरला गुरू-शिष्य परंपरेचा सोहळा
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांचा हृदयस्पर्शी सत्कार

अमरावती /14 डिसेंबर – रस्त्याच्या दोनी बाजुला विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध उपस्थिती, ढोल ताशाचा गरज आणि मान्यवरांच्या आगमन होत असतांना विद्यार्थ्यांच्या कडकटामध्ये शारीरीक शिक्षणाच्या कवायतींचे सादरीकरण. हा क्षण होता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांच्या स्वागताचे. मंडळाचे विद्यार्थी डॉ. सुभाष गावंडे नुकताच श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्त झाले आहे. हा क्षण मंडळाच्या गौरवामध्ये भर टाकणारा होता. शनिवार दि.13 डिसें. रोजी सकाळी 11 वाजता डॉ. गावंडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे आयोजीत करण्यात आले होता. विशेष म्हणजे, प्राचार्य पदाची सुत्र हातात घेताच डॉ. गावंडे यांनी सर्वप्रथम पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची भेट घेत आशीर्वाद घेतले होते. ही बाब मंडळाच्या गुरू-शिष्य परंपरेला साजेशी ठरली.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत या सत्कार सोहळ्याला व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके उपस्थित होते. सत्कार मुर्ती प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, प्रा.डॉ. कविता गावंडे, मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य व मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. श्रीनिवास देशपांडे, माजी प्राचार्य व श्री हव्याप्र मंडळाच्या एल्युम्नी असो. चे अध्यक्ष डॉ. अजयपाल उपाध्याय, माजी प्राचार्य डॉ. के.के देबनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंडळाच्या श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व डिसीपीई महाविद्यालयाचे प्रतिभावंत विद्यार्थी प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांचा पत्नी प्रा.डॉ. कविता गावंडे यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये शिकलो, लहानाचा मोठा झालो त्याच तपोभुमीवर सत्कार होणे आणि त्यासाठी सर्व गुरूजनांची उपस्थिती हा क्षण आयुष्यातील सर्वाधिक अविस्मरणीय व प्रेरणादायी ठरला आहे. श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयात शालेय जीवनाची सुरूवात झाली आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयातून जगण्याला सक्षम करता आले. मंडळामध्ये शिक्षणाकरीता दाखल झाले तेव्हा माझ्या आजोबाची लोखंडी पेटी आणली होती आणि जेव्हा शिक्षण पुर्ण झाले तेव्हा मंडळाचे संस्थापक दादाजी (कै. अंबादासपंत वैद्य) यांची लाकडी पेटी घेवून गेला, जी आजही माझ्याजवळ आहे. प्रामुख्याने स्वत:ला साकार, सिद्ध करतांना मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे व्यक्तीमत्वाचे प्रभावित झालो होतो. जसा त्यांच्या बुलेटच्या दणकट आवाज तसाच वैद्य साहेबांचे व्यक्तीमत्व ! मात्र, मनाने तेवढेच दयाळू आणि प्रेमळ होते. अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांकरीता गुरूवर्य वैद्य साहेबांची पाठीवर थाप आणि प्रशिक्षक हरणे सर, उत्तमचंद ठाकुर सर प्रशिक्षकांमुळे आयुष्यामध्ये पुढे जाता आले.डॉ.अरुण खोडस्कर सरांच्या मारगदर्शनामुळे पी. एच. डी .झालो .श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी खरोखर भाग्यवान असून स्व:ला सिद्ध करण्यासाठी हीच खरी तपोभुमी आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये यशोशिखरावर जात असतांना या संस्थेशी आयुष्यभर ऋणानुबंध जोपासा असा यशोमंत्र देत श्री हव्याप्र मंडळ प्रती व सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन व डॉ. सुभाष गावंडे यांचा परिचय प्रा. आशिष हटेकर यांनी करून दिला. प्रास्ताविक एल्यम्नी असो. चे अध्यक्ष, माजी प्राचार्य डॉ.अजयपाल उपाध्याय यांनी केले. आभार प्रा. मधुकर बुरनासे यांनी केले. कार्यक्रमाला मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, प्रशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप आगे बढो ! सबसे आगे बढो…. या स्फुरण चढविणार्या जयघोषाने झाले.याप्रसंगी रामकृष्ण क्रीडा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित उपमुख्याध्यापिका अलका आडे व सर्व शिक्षकानच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला तसेच स्पोर्ट स्कूल प्रमुख विकास अजमेरे वाहोकार प्रा.कमलाकर शहाणे व प्रा.अतुल पाटील यांच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता ल्युमिनि असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ.ललित शर्मा सहसचिव डॉ. डब्ल्यू कॅनेडिसिग, डॉ. प्रतिमा बोंडे, डॉ. मनोज कोहळे डॉ. योगेश निर्मळ विकास अजमिरे, दिवेश मजेठीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे माजी वरिष्ठ प्रा. जयंत गोडसे डॉ. दीपक फडणीस डॉ.सूर्यकांत पाटील प्रा. संतोष इंगोले, प्रा विलास दलाल रवी दलाल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मीकांत खंडागळे, परीक्षा नियंत्रक डॉ. विजय पांडे अभ्यासक्रम प्रमुख डॉ. संजय तिरथकर, डॉ. दीनानाथ नवाथे, डॉ.महेंद्र लोणकर, डॉ. अनिता गुप्ता प्रा.नितीन वानखडे, महाविद्यालय समस्त प्राध्यापक तसेच विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
धुरंधर बना ! : डॉ. श्रीकांत चेंडके
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ केवळ संस्था असून ती भारतीय गुरूकुल परंपरेचे वास्तविक स्वरूप आहे. येथे गुरू-शिष्य पंरपरेचे जतन होत असून प्राचार्य डॉ. गावंडे यांचा हृदयस्पर्शी सत्कार सोहळ्यातून ही प्रेरणा अधिक व्यापक झाली आहे. डॉ. गावंडे यांना घडविणारे येथील सर्वच प्रशिक्षक, गुरूवर्य धुरंदर असून वर्तमान विद्यार्थ्यांनी मंडळाचा संस्कार आत्मसात करून जीवनाचे धुरंदर बना असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके यांनी केले. सध्या धुरंधर चित्रपट चांगलाच गाजत असून डॉ. चेंडके यांनी या चित्रपदाचा संदर्भ भाषणामध्ये देत उपस्थितांमध्ये हास्य व प्रेरणा फुलवली. हे विशेष !




