राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवा

नागपूर /12 डिसेंबर : नुकताच झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचाय तींच्या निवड णुकीत राज्य निव डणूक आयो गाच्या कार भाराचे अक्ष रश: वाभाडे निघाल्याचे सर्वांनी पाहिले. 10 डिसेंबर रोजी पटोलेंनी विधानसभेत हाच मुद्दा उपस्थित केला होता.
त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना हा विषय सभागृहाच्या अख्यारितील नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी हाच मुद्दा पुन्हा आज (12 डिसेंबर) उपस्थित करून विधानसभा दोन-तृतियांश मतांनी ठराव करून लोकसभा, राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे पाठवू शकते, अशी माहिती सभागृहाला दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल विरोधी पक्षांतील नेत्यांनी जशी नाराजी व्यक्त केली होती तशीच नाराजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केली होती, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button