प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा
पी.आर.कार्डचे प्रस्ताव घेऊन महेंद्र कॉलनीवासी भूमि अभिलेख कार्यालयावर धडकले

* निलेश वडे यांची मागणी
अमरावती /12 डिसेंबर : मौजे तारखेडा येथील शेत सर्व्हे 22/1/22/2/23/2, मध्ये राहणार्या महेंद्र कॉलनी यासह अन्य भागातील नागरिकांचे पी.आर कार्ड ची प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाने निकाली न काढल्याने त्यांना आपल्या मूळ मालमत्तमेचा मालकीहक्क मिळण्यास विलंब लागत आहे. या संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा भूमिअभिलेख कार्यालया मार्फत दिरंगाई होत असल्याने सामाजिक कार्यकर्ता निलेश वडे यांच्या नेतृत्वात स्थानिक महेंद्र कॉलनी भागातील बहुसंख्य नागरिक भूमी अभिलेख कार्यालयावर धडकले. यावेळी नागरिकांनी आपले पी.आर. कार्ड बाबतचे प्रस्ताव उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे कि, मौजे तारखेडा येथील नागरिकांना पी.आर.कार्ड वाटपाची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून त्यांना भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सर्वे करून सनद वाटप करण्यात आली. त्यानुसार त्यांनी चालान सुद्धा भरलेले आहेत.परंतु खरेदी नुसार फेरफार न झाल्याने पी.आर. कार्ड वाटपास विलंब लागत आहे. म्हणूनच महेंद्र कॉलनी भागातील जमिनीच्या मूळ मालकांना त्यांचा खरेदी नुसार फेरफार करण्यात यावे व पी.आर कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी निलेश वडे यांनी उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अमरावती यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित कार्यालयाकडून पी.आर. कार्ड मिळण्यासाठी नागरिकांनी आपले मुळ प्रकरणे सुद्धा सादर केलीत.यावेळी सारिका निलेश वडे, अविनाश पारडे, बंडू निंभोरकर ,रोशन भांबुरकर नारायणराव अंबाडकर, सुभाषराव इंगोले, त्रंबकराव गाठे ,बाळासाहेब अनिलकर , उषा अनिलकर, मीना चिंचमलातपुरे, मुरलीधर बाहेकर, संजय रघुनाथ मुंजाळे, भाऊराव गावनेर, विलासराव गावनेर, मारोतराव खैरकर, रमेशराव कोंडे, भीमराव रेवस्कर , किसनराव मोरे, बालमुकुंद श्रीवास, आशा नांदेडकर विश्वनाथ बागडे, आनंदराव बागडे, सुनीता चव्हाण , संगीता राऊत, विजय अंबाडकर, नामदेव सरोदे, शीला भाकरे, सुभाष शंकरराव अंबाडकर , रोशनी भटकर, मनोरमा भुयार , पांडुरंग बावणे, देवीदासराव बावणे, बेबीताई चारथल,लताताई लव्हाळे, तुळसाबाई मानकर, रामदास मोहकार, शालिनी देशमुख, विलासराव कडू , मुरलीधर बोपुलकर, चंद्रशेखर भोंबे, किसन पेठे, विलासराव ढेवले, लखन पारखे, शोभा मेशकर , बेबी मेशकर , जनार्दन सरोदे ,मधुकर आमझरे यांचे सह महेंद्र कॉलनी , खरैय्या नगर , लक्ष्मीनगर , सरस्वती नगर भागातील नागरिक सहभागी झाले होते.




