बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी दोन अधिकारी निलंबित

नागपूर – बुलढाणा जिल्ह्या तील बोगस जात प्रमाण पत्र प्रकरणी आज सामाजिक न्याय विभागाने मोठी कारवाई केली आहे. बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी तीन अधिकार्यांना दोषी ठरविण्यात आले असून दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय दिली. तसेच या आधिकार्यांवर फौजदारी कारवाई करावी अशा सूचना सभापती राम शिंदे यांनी दिल्या आहेत.काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती ‘अ’ संवर्गातील बंजारा समाजावर अन्याय झाल्याचे सांगत, जिल्ह्यात 50 खोटी आणि बोगस जातप्रमाणपत्र काढण्यात आली असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या 50 जणांनी विमुक्त जाती संवर्गाची बोगस जात प्रमाणपत्रे मिळवून वैद्यकीय शिक्षण आणि नोकरीचा लाभ घेतला.




