माळी समाजाचे राज्यस्तरीय परिचय संमेलन रविवारी

‘फुलमाळ’ परिचय पुस्तिकेचे होणार विमोचन

अमरावती /11 डिसेंबर : येथील माळी समाज बहूउदेशीय संस्था महाराष्ट्र व सावता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजाचे 13 वे राज्यस्तरीय परिचय संमेलन रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी माळी बोर्डिंग मुधोळकर पेठ अमरावती येथे सकाळी 11 ते 4 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सदरील परिचय संमेलनात उपस्थित मान्यवर यांचे हस्ते ’ फुलमाळ ’ या परिचय पुस्तिकेचे विमोचन होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सागर बनकर,उदघाटक म्हणून सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे, स्वागताध्यक्ष म्हणून माळी समाज बहू. संस्थेचे उपाध्यक्ष गणेश काटवले,तर विशेष अतिथी म्हणून आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, आमदार रविभाऊ राणा, जेष्ठ विधीतज्ञ प्रशांत देशपांडे, म. फुले अर्बन कॉप. बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, माळी मिशनचे राज्य समन्व्यक इंजि. वासुदेव चौधरी, क्षेत्रीय माळी शिक्षण संस्थेचे सचिव राजाभाऊ हाडोळे,शारदा कोथिंबीरे,पथ्रोट येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर रसे, मंजुषा महाजन, सविता भेले, प्रवक्ते प्रकाश मारोटकर, रामा सोळंके, राजश्री जढाळे आदी मान्यवर उपस्थित राहतील.सदरील परिचय संमेलनात उप वर युवक युवती यांचे परिचय सत्र होणार असून माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या समाज बांधव यांचा सत्कार व सन्मान होईल. या संमेलनात निमंत्रण पत्रिकेतील विशेष निमंत्रीत अतिथी, प्रमुख अतिथी व माळी समाजातील सर्व शाखेतील पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीकांत नागरिकर, प्रदेश सहप्रवक्ता नाना आमले, प्रदेश उपाध्यक्ष आकाश वाघमारे, विजय पाटणकर, श्याम गोटफोडे, कृष्णा चिचमलकर,मनोज उपरीकर, सुरेश राऊत, युवा अध्यक्ष अमर देशकर, करण उपरीकर, कार्याध्यक्ष शेखर माळोदे, सचिव श्रीधर देशमुख, उपाध्यक्ष विजय सावरकर, बंडू कथिलकर, अजय राऊत, चेतन कांडलकर, दिनेश भुसारी, प्रसिद्धी प्रमुख ऍड. प्रभाकरराव वानखडे, सरचिटणीस अस्विन सातव, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश नागापुरे, शहर अध्यक्ष पंकज कांडलकर, वैभव बेलसरे, राजेश अंबाडकर,आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button