शिवांश तांडेकर वयाच्या केवळ सतराव्या वर्षी सर्टिफाइड हेल्थ कोच बनला

अमरावती /10 डिसेंबर : गुजरात येथील कोच फॉर लाइफ आणि (आय.एस.एच.एफ.) इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेल्थ अँड फिटनेस च्या माध्यमातून चालवल्या जाणार्‍या आहार तज्ञ आणि हेल्थ कोच या ट्रेनिंग मध्ये अमरावती येथील शिवांश महेशकुमार तांडेकर हा सर्टिफाइड आहार तज्ञ बनलेला आहे. स्वतःच्या आरोग्याची कडे आजच्या काळात लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस भारत हा डायबिटीस कॅपिटल म्हणून समोर येतो आहे अशातच अगदी लहान वयात आरोग्याची काळजी प्रत्येकाला घेता यावी आणि त्यांना मार्गदर्शन करावे हा शिवांशचा उद्देश आहे.
चुकीचा आहार घेण्यामुळे त्याची स्वतःची तब्येत वारंवार बिघडायची तेव्हा स्वतःच्या आरोग्यावर काम करण्यासाठी त्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेतला. इथून पुढे लोकांच्या जीवनात लाइफस्टाईल मुळे होणार्‍या आजारांवर कसं नियंत्रित करून संपूर्ण स्वास्थ्यमय जीवन कसं जगावं यासाठी तो पुढे मार्गदर्शन करण्यात आहे. त्याच्या या कार्यात त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे संपूर्ण आयएसएचएफचे सर्व कोच यांचे तो मनापासून आभार मानतो. या यशासाठी आयएसएचएफ चे फाउंडर डॉ. लव पटेल सर यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले. आई-बाबांचा आशीर्वाद प्रत्येक क्षणआणि त्याच्या सोबत आहे असा तो सांगतो. तसेच त्याला वेळोवेळी मदत करणारे त्याचे मित्र देखील या यशाचे भागीदार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button