आज हिवाळी अधिवेशनावर मोर्चा व बेमुदत साखळी उपोषण
आंदोलनात सहभागी व्हा-शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांचे आवाहन

* शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शिक्षकांना शिकवू द्या
* अशैक्षणिक कामे बंद करा
अमरावती /8 डिसेंबर – शिक्षक पात्रता परीक्षा (ढएढ) संबंधाने शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, 15 मार्च 2024 चा अन्यायकारक संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका शाळा व मुलांचे शिक्षण वाचवण्यासाठी होणार्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व शिक्षक समितीच्या महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे यांनी पत्रकातून केले आहे
शिक्षक पात्रता परीक्षा (ढएढ ) संबंधाने शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा या व इतर मागण्यांबाबत अनेकदा शासनाकडे पत्रव्यवहार, संबंधित मंत्री महोदयांसमवेत बैठका घेण्यात आल्या पण कोणताही अनुकूल प्रतिसाद शासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात आगामी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन व प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे व धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही सरकारने याबाबत संघटनांशी अद्याप पर्यंत कोणताही संवाद न साधल्याने 9 डिसेंबरला पुन्हा हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असून राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे तशी नोटीस शासनास दिलेली आहे.
अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा समन्वयातून हे शाळा बंद आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वी करुन प्रसार माध्यमाद्वारे सरकारचे शिक्षण विषयक धोरण चुकीची असल्याचे मोठ्या संख्येने राज्यातील शिक्षकांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा,मूक मोर्चा आणि धरणे आंदोलन काढण्यात आले यातून समाजाचे प्रबोधन तसेच जनजागृती करण्याचा प्रयत्न शिक्षक संघटनांनी केला आहे.शिक्षकांच्या प्रश्नापेक्षा गोरगरीब जनतेच्या पाल्यांचे सक्तीचे व मोफत शिक्षण शासनाच्या या धोरणामुळे हळूहळू बंद होणार आहे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 9 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर महामोर्चाचे आयोजन शिक्षक श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले असून तसेच राज्य कर्मचारी संघ संघटनेने हे मुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा सरकारला दिला असून या आंदोलनात सांगली जिल्ह्यातून सर्व संघटनाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी पत्रकार द्वारे केले आहे.या मोर्चाचे नेत्ृत्व नागपूर शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती आणि म.रा.प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा नागपूरचे लिलाधर ठाकरे करणार असुन याच वेळी मध्यवर्ती संघटने मार्फत सुरु होणार्या साखरी उपोषणाला शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे बसणार आहे. या मोर्चात व साखरी उपषोणाला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे एच.बी. घोम,डी.एस.पवार, शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, सल्लागार विजयकुमार पंडित, महादेव पाटील माळवदकर,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर,विलास कंटेकुरे,राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील,राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर,राज्य संघटक राजेंद्र खेडकर,सुरेश पाटील,
राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील,सतिश सांगळे,राज्य संपर्क प्रमुख किशन बिरादार,राज्य प्रवक्ता नितीन नवले,राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर,राज्य ऑडिटर पंडित नागरगोजे,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे,नपा-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,ऊर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक अली यांनी केले आहे.




