बकरी ईदनिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था
एसआरपीएफचे पथक तैनात

अमरावती /5 जून: उद्या शनिवार, 7 जून रोजी बकरी ईदनिमित्त शहरात 8 निश्चित पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत आणि डीसीपी, एसीपी, निरीक्षकांसह शेकडो पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उद्यापासून हे सर्व कर्मचारी त्यांच्या संबंधित कर्तव्यावर तैनात असतील.
राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी आणि 300 होमगार्ड्स देखील पोलिसांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, सीपी अरविंद चावरिया यांनी नागरिकांना बकरी ईद पारंपारिक आणि शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले असून या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या गोवंशाची कत्तल होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. अशा परिस्थितीत, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकार्यां सोबत बैठक घेऊन व्यवस्था आणि सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.