आज अ. भा. ग्राहक कल्याण परिषदेची राज्यस्तरीय बैठक

राष्ट्रीय पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती

अमरावती /7 डिसेंबर : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय बैठक आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी कोंडेश्वर रोड वरील मधुबन वृद्धाश्रमात सकाळी 11 ते 4 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय चेअरमन विख्यात सेनई उपस्थितीत राहतील. तर उदघाटक म्हणून संघटनेचे मार्गदर्शक माजी उपमहापौर चेतनभाऊ पवार, मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय प्रधान महासचिव देवेंद्र तिवारी, नागपूर ग्राहक मंचच्या माजी सदस्या डॉ. चंद्रिका बैस, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय निमंत्रित अध्यक्ष शांताबाई
उखळकर, नॅशनल प्रिन्सिपल जनरल सेक्रेटरी ऍड. अनुजा बाजपेयी,महिला विंगच्या राष्ट्रीय निमंत्रीत चेअरमन सीता नानका, राष्ट्रीय चेअरमन शिल्पा रेड्डी, उपाध्यक्ष व्ही करुनाकरण, राष्ट्रीय वर्किंग प्रेसिडेंट प्रशांत चौधरी, उषाताई फाले, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. अल्वीना हक,राष्ट्रीय महासचिव रंजिता नवघरे, चंद्रकांत भडांगे, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पारखे, राज्य कार्याध्यक्ष रंजिता चापके आदी मान्यवर उपस्थित राहतील. आजच्या बैठकीचे प्रमुख आयोजक तथा संघटनेचे नवनियुक्त स्टेट चेअरमन गजानन मुदगल आणि राज्य सचिव ऍड. प्रभाकर वानखडे यांचा विशेष सत्कार मान्यवर यांचे हस्ते होईल. राज्यातील इतरही नियुक्त्या सदरील बैठकीत होणार आहेत. सदरील बैठकीला राज्यातील विभागीय, जिल्हा, तालुका अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे राज्य चेअरमन गजानन मुदगल, राज्य सचिव ऍड. प्रभाकर वानखडे, राज्य संघटक विजय जाधव, उपाध्यक्ष विजय बैस आदी पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button