भगवान दत्तात्रेय हे सगळ्या सद्गुरूंचे मूळ स्थान असलेले परम सद्गुरू

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* आदिगुरू श्री दत्तात्रेय चरणी केली विश्वमांगल्याची प्रार्थना

अमरावती/5 डिसेंबर – श्री दत्तात्रेयांनी अनेकांना अनेक रूपांत दर्शन दिलेले आहे. वेगवेगळ्या स्थळी, वेगवेगळ्या काळी मुमुक्षुना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक रूपांत दत्तावतार झालेले आहेत. म्हणजेच अनेक ठिकाणी असलेल्या अधिकारी व्यक्तीच्या मार्फत दत्तात्रेय सांप्रदायाचे चक्र सुरु ठेवलेले दिसते.
अकराव्या, बाराव्या शतकातील महानुभाव पंथाची परंपरा दत्तप्रणित आहे. या पंथाचे श्री दत्तात्रेय हे आदि गुरु होत. याच्याही आधी कित्येक शतकात नाथपंथीयांनीही श्री दत्तगुरूंनाच आदि दैवत मानले. श्री गोरक्षनाथ, श्री मच्छिन्द्रनाथ या नाथपंथीय योगी सांप्रदायात श्री दत्तात्रेयांचाच संबंध दिसतो.भगवान दत्तात्रेय हे सगळ्या सद्गुरूंचे मूळ स्थान असलेले परम सद्गुरू. श्री दत्तात्रेयांचा जन्मदिवस त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच अनुग्रहाने आपण साजरा करू. आज दत्तजयंतीच्या मुहूर्तावर श्री सद्गुरूंना शरण जाऊन, त्यांच्याकडून दिक्षा घेऊन, सत्य व त्यागाच्या मार्गावर चालण्याचे वचन देऊन उत्सव साजरा करू या. आपल्याला बंधनमुक्त करणे हे श्री दत्तात्रेयांचे कार्य. बंधने कसली, तर अज्ञानाची, मायेची, रागाची, लोभाची, असुयेची, राग – द्वेषादिकांची. आपण या सर्व बंधनांमध्ये जखडलेले आहोत. ती सोडविल्यास आनंदी आनंद गडे. गुरुकृपेने हा आनंद आपल्याला मिळू शकतो. ही गुरुकृपा अखंड सुरु राहण्यासाठी श्री दत्तात्रेय आहेत. असे प्रतिपादन आमदार – सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी आदिगुरु श्री दत्तात्रेय यांच्या श्री दत्त जयंती 2025 निमित्याने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमरावती शहरात दत्तजयंतीच्या मुहूर्तावर श्री सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी श्री दत्तात्रेय प्रभुच्या प्रतिमेस नमन – पूजन – वंदन करून त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचे दर्शन व कृपाशीर्वाद घेतले.या निमित्ताने आयोजित विविध आध्यात्मिक -धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्यासमवेत आमदार – संजय खोडके, यश खोडके, श्री नवनाथ मंदिर संस्थान, दामोधर कॉलनी – स्वावलंबी नगर,श्री स्वामी समर्थ देवस्थान, जनार्धन पेठ, अमरावती येथील भावीकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button