प्रभाक क्र.18 मधिल 40 लक्ष रुपयांचा विकास कामांचे भूमीपूजन
आ.रवि राणा यांच्या प्रयत्नातून राजापेठ

सुनिल राणा यांची उपस्थिती
अमरावती /5 डिसेंबर : राजापेठ प्रभाग क्रमांक 18 मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांना आज मंगलमुहूर्त लागला. एकूण 40 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक श्री. सुनिल राणा व माजी नगरसेवक श्री. प्रशांत वानखडे यांच्या हस्ते संपन्न झाले. ही सर्व कामे आ. रवि राणा यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाली असून स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः सिताराम बाबा नगर परिसरातील नागरीकांनी अनेक वर्षांपासून सुसज्ज रस्ते व सुविधा यांची मागणी केली होती. हबालानी यांच्या घरासमोरील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, परिसरातील पादचारी व वाहनधारकांच्या सोयीसाठी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तसेच इतर आवश्यक मूलभूत कामांचा या विकासात समावेश आहे.
भूमिपूजनावेळी बोलताना मार्गदर्शक सुनिल राणा यांनी सांगितले की,नागरिकांच्या गरजा ओळखून विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आ. रवि राणा सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश असून आगामी काळातही अशाच प्रकारची अनेक कामे पूर्ण केली जातील. स्थानिक नागरिकांनी या कामांबद्दल समाधान व्यक्त करत आ. रवी राणा, युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.या भूमिपूजन सोहळ्यास नंदा सावदे, वैशाली ढेपे, पिंकी चांदवानी, सुधिर सुर्यवंशी, महेश मुलचंदानी, सुरेश पडोळे, सेवकराम केवलरामनी, पुरनसेठ हबलानी, रोशनलाल हबलानी, संतोष सबलानी, रवि इंगोले, सुरेश हबलानी, संतीश ढेपे, मनोज चंदवानी, संजय केवलरामानी, राजा नानवानी, मुकेश हरवानी, अनुप हरवानी, राजेश शादी, अनिल अडवानी, प्रतीक हबलानी, सत्यवान हरवानी आदि प्रभागातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी विकासकामांच्या शुभारंभाचे स्वागत करत आमदार रवी राणा यांचे आभार मानले.




