अचलपूर महावितरणमध्ये बदली
कार्यक्षम अधिकार्यांना दिला भावनिक निरोप, उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव

अचलपुर /5 जून: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अचलपुर विभागातील तीन महत्त्वाच्या अधिकार्यांची अलीकडेच बदली करण्यात आली आहे. या अधिकार्यांमध्ये सिटी 1 उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. मनोज टवलारकर, सिटी 2 चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. संजय कुटे, तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. संजय पुरी यांचा समावेश आहे. या तिघांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय सेवा बजावल्या असून, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना महावितरणच्या वतीने भावनिक निरोप देण्यात आला.
या अधिकार्यांनी ग्राहकांना उत्तम दर्जाची वीज सेवा पुरवण्यासोबतच समाधानकारक वसुली देखील सुनिश्चित केली. तसेच, वीज अपघातांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहिमा व तांत्रिक उपाय योजनाही प्रभावीपणे राबवल्या. वेळेवर वीज पुरवठा, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण, लाईन व ट्रान्सफॉर्मरची देखभाल या अनेक कामांमध्ये त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. निरोप समारंभावेळी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी – हर्षपाल सावतकर, राजेश मिसूरकर, निलेश शिंदे, मनोज सरदार, गौरव निस्ताने, राजेश गवळी, निलेश रोटे, गौरव खवळे, बिस्मिल्लाह शाह, पंकज माहुलकर, दीपाली लांडे, आकाश, शेख साजिद आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी त्यांचा सत्कार करत आगामी सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी एकमुखाने सांगितले की, हे अधिकारी केवळ कुशल प्रशासक नव्हते, तर संवेदनशील, जबाबदार आणि जनतेशी नेहमी जोडलेले अधिकारी होते. त्यांच्या जागी नवीन अधिकारी येतील.