महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
डिसेंबर ते जानेवारी 2026 पर्यंत विविध परीक्षांचे नियोजन

अमरावती /5 डिसेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (चझडउ) सन 2026 मध्ये होणार्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या परीक्षांसह गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांचे सुध्दा अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.महत्त्वाच्या सन 2026 मध्ये होणार्या परीक्षांच्या प्रमुख तारखा पुढीलप्रमाणे आहे : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026: ही पूर्व परीक्षा 31 मे 2026 रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑगस्ट 2026 मध्ये अपेक्षित आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026: नागरी सेवा मुख्य परीक्षा 03 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2026 या दरम्यान होईल. या मुख्य परीक्षेचा निकाल अंदाजे फेब्रुवारी 2027 मध्ये अपेक्षित आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026: पूर्व परीक्षा 14 जून 2026 रोजी तर, मुख्य परीक्षा 05 डिसेंबर 2026 रोजी नियोजित आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026: पूर्व परीक्षा 12 जुलै 2026 रोजी तर, मुख्य परीक्षा 13 डिसेंबर 2026 रोजी नियोजित आहे.




