जागतिक अपंग दिनानिमित्त रुग्ण व अनाथ नागरिकांना फळांचे वाटप
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेतर्फे आयोजन

अमरावती /4 डिसेंबर : जागतिक अपंग(दिव्यांग) दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई-32 जिल्हा शाखा अमरावती तर्फे सामाजिक बांधिल की जपत विशेष उपक्रम राबविण्यात आला. राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील व माजी राज्य सचिव परमेश्वर बाबर यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित आणि जिल्हा सचिव किशोर मालोकार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.
शासकीय जिल्हा रुग्णालय, अमरावती येथे डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रुग्णांना संघटनेतर्फे फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यानंतर इशदया मदर तेरेसा आश्रम येथे सिस्टर रोसीन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तेथील अनाथ मुलांना व नागरिकांना ही फळे व बिस्किटे देऊन संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित, जिल्हा सचिव किशोर मालोकार, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत मामनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू डांगे, जिल्हा उर्दू प्रतिनिधी अफसर खान, जिल्हा संघटक भारत जामनेकर, महिला संघटक इंदिरा रेवस्कर, अझर सर तसेच संघटनेचे इतर सभासद उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकार्यांनी रुग्ण व अनाथ मुलांची विचारपूस करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच दिव्यांग दिनाची खरी भावना असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित यांनी सांगितले. उपक्रमाबद्दल रुग्णालय प्रशासन तसेच अनाथाश्रम व्यवस्थापनाने संघटनेचे आभार मानले.संघटनेतर्फे अशा सामाजिक आणि हितकारक कार्यक्रमांची पुढेही अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.




