राष्ट्रवादीच्या दिवाकर गमे यांना अटक

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

वर्धा/8 मार्च जिल्ह्यातून ‘जागतिक महिला दिना’च्या दिवशी समा जाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर तरुणीकडे दीर्घकाळ शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. दिवाकर गमे (वय 78 ) असे या आरोपीचे नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी 2022 मध्ये अवघ्या 21 वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत, गेल्या सुमारे पाच वर्षांपासून तिच्याकडे सातत्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button