एक-दीड वर्षात शेतकरी कर्जमाफी होईल

भाजपचे आ.परिणय फुके यांचा दावा

नागपूर /27 ऑक्टोबर – शेतकरी कर्जमुक्तीसह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली उद्या, मंगळवारी नागपूरमध्ये ‘महा एल्गार’ आंदोलन होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षाविरोधात बच्चू कडू यांनी यावेळी ‘आरपार’च्या लढ्याची हाक दिली आहे. दरम्यान, या आंदोलनाची गरज नाही असे म्हणत भाजप आमदार परिणय फुके यांनी येत्या एक ते दीड वर्षात शेतकरी कर्जमाफी होईल असा दावा केला. त्यांनी जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असेही सांगितले. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की उद्या साडेदहा वाजता मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली असून ती बैठक फलदायी झाली आणि सर्व मागण्या मान्य झाल्या तर आंदोलन करण्याची गरजच उरणार नाही, असे मला वाटते. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी देखील याबाबत आपले मत व्यक्त करत शेतकरी कर्जमाफी 100 टक्के होणार अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, “आज राज्याची आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला वाटते की एका-दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो आणि हे सरकार अजून एक वर्षही पूर्ण करू शकलेले नाही.

संबंधित बातम्या

Back to top button