सालोरा येथील युवा शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या

तिवसा /18 ऑक्टोबर : बु. येथील 37 वर्षीय युवा शेतकर्यांने शुक्रवार ता. 17 रोजी रात्री 9:30 वाजता दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रवीण विेशासराव आठवले असे आत्महत्या करणार्या युवा शेतकर्याचे नाव आहे.मृत प्रवीण आठवले हे अविवाहित असून अल्पभुदारक शेतकरी होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती या दोन एकराच्या शेतातून घराचा उदरनिर्वाह होता. मात्र अतिवृष्टी पावसामुळे शेतात उत्पन्न झाले नाही त्यात डोक्यावर कर्जाचे डोंगर याच विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचले व रात्री दोरीच्या साह्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली, वडील आधी मरणपावल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या पच्छात आई,बहीण दोन भाऊ असे कुटुंब आहे. एका युवा शेतकर्यांने आत्महत्या केल्याने गावात शोकाळ पसरली आहे.




