नयना गुंडे नव्या कमिश्नर
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची मुंबईला बदली

प्रशासकीय वर्तुळात बदल्यांचे मोठे फेरबदल
अमरावती/27 मार्च : राज्यातील प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ झाली असून अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. शासनाने त्यांच्याकडे आता मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सोपविली आहे. त्यांच्या जागी आता नयना गुंडे या अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.
शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश काढले आहेत. श्वेता सिंघल यांनी आपला सध्याचा कार्यभार नयना गुंडे यांच्याकडे सोपवून तात डीने नव्या पदावर रुजू होण्याच्या
सूचना सह सचिव सुभाष उम राणीकर यांनी दिल्या आहेत. श्वेता सिंघल या मुंबईत रुबल प्रखेर-अगरवाल यांची जागा घेतील. तर अमरावतीच्या गादीवर बसणार्या नयना गुंडे या यापूर्वी पुण्यात महिला व बाल विकास आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
महसूल विभागातील हा मोठा बदल मानला जात असून, नव्या अधिकार्यांच्या नियुक्तीमुळे अमरावती विभागाच्या प्रशासकीय कामाला आता नवी गती मिळण्याची शक्यता आहे. श्वेता सिंघल यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी ई-ऑफिस आणि ई-एचआरएमएस प्रणालीचा वापर वाढवण्यावर विशेष भर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मेट्रोचा कारभार आता सिंघल यांच्या हाती-विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची मुंबईत बदली झाली असून त्यांच्याकडे महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जागी नयना गुंडे आता अमरावती विभागाचा कारभार पाहणार आहेत.




