नांदगावात रंगली बैल जोडी सजावट स्पर्धा
मुंगसाजी महाराज चौकात पोळा उत्सवात

नांदगाव खंडेश्वर /13 सप्टेंबर – स्थानिक मुंगसाजी महाराज चौकात पोळा उत्सवात बैल जोडी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन स्वर्गीय संजय लीलाधरजी पारसकर स्मृती प्रित्यर्थ पारसकर कृषी केंद्राच्या वतीने माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर व अभिषेक पारसकर यांनी केले होते. या स्पर्धेत 5555 रुपयाचा प्रथम पुरस्कार प्रमोद मारोटकर यांच्या बैल जोडीला देण्यात आला. 3333 रुपयाचा द्वितीय पुरस्कार आसिफखा यांच्या बैल जोडीने व 2222 रुपयाचा तृतीय पुरस्कार गजानन शिरभाते यांच्या बैलजोडीने पटकावला. यावेळी पोळ्याला तोरणाखाली आलेल्या सर्व जोडी मालकाचा गौरव करण्यात आला. बैल जोडी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ शेतकरी माजी सरपंच देविदासजी सुने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी नांदगावचे ठाणेदार आनंद पीदुरकर, आयोजक माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, अभिषेक पारसकर, कावड यात्रा समितीचे डॉ. भूषण पोतदार, माजी नगराध्यक्ष संजय पोपळे, नगरसेवक योगेश चवाळे, अविनाश ब्राह्मणवाडे, वैभव कोंडवते, घनश्यामजी सारडा, प्रदीप जोशी, अरुण लहाबर, गजानन मारोटकर, गुणवंतराव कोळमकर, स्पर्धेचे परीक्षक नागोरावजी दिघडे, संजय अंभोरे, उमेश चौकडे, सुरेशराव रावेकर, महादेवराव काळेकर, मुमताजभाई कुरेशी, महादेवराव सोनोने, व अनिल शिरभाते, अरुण भाऊ गुल्हाने, गजानन डोक, अशोक दैत, विजय सुने ही मंडळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होती





