मोसीकोलचे जमिनीच्या विक्रीसाठी ई-निविदाच्या तारखांमध्ये सुधारणा

तांत्रिक बोली 12 तर आर्थिक बोली 19 जानेवारीला उघडणार

* महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शुद्धीपत्रक जारी

अमरावती/29 डिसेंबर – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची उपकंपनी असलेल्या मोसीकोलने अमरावतीमधील जमिनीच्या विक्रीसाठीच्या ई-निविदाबाबत दुसरे शुद्धिपत्रक जारी केले आहे.
आचारसंहितेच्या अंमल बजावणीमुळे हे शुद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, आचारसंहिता संपल्यानंतर व्यावसायिक बोली 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता उघडल्या जातील, तसेच बोली सादर करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:00 पर्यंत वाढविण्यात आली आहे, तर तांत्रिक बोली उघडण्याची तारीख 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता निश्चित करण्यात आली आहे. मोसीकॉलने स्पष्ट केले आहे की, बोलीशी संबंधित सर्व पेमेंट फक्त महाटेंडर्स पोर्टलद्वारे ऑनलाइन केले जातील. पोर्टलच्या बाहेर मोसीकॉलच्या खात्यात थेट केलेले कोणतेही पेमेंट लेखी विनंती आणि बँक व्यवहार तपशील प्राप्त झाल्यानंतर संबंधित बोलीदाराला परत पाठविण्यात येईल. हे शुद्धिपत्रक बोली दस्तऐवजाचा अविभाज्य भाग मानले जाईल. असा आदेश निविदा प्राधिकरण, मोसीकॉलने जारी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button