मोर्शी नगरपरिषद निवडणूक, भाजपकडून उमेदवार जाहीर
आ.उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या विकासाला बळ

मोर्शी /17 नोव्हेंबर -मोर्शी नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व 12 प्रभागांमधील उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी रेशमा नितीन उमाळे यांची निवड पक्षाने केली असून, प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे जाहीर झाले आहेतः
प्रभागनिहाय उमेदवारांची यादी-प्रभाग 01: अनिल दरवाई, योगिता ठाकरे, प्रभाग 02 : सागर पाटील, नूतन जाऊंजाळकर, प्रभाग 03 : सुनील ढोले, कल्पना सतीश लेकुरवाले, प्रभाग, 4 : नितीन राऊत, प्रीती मनिष केचे, प्रभाग 05 : राधा वानखडे, रवी मोरे, प्रभाग 06: सुनीता कोहळे, बाबाराव जाधव, प्रभाग 07 : प्रिती देशमुख, हर्षल चौधरी, प्रभाग 08: महेंद्र कोडापे, मोनाली फंदे, प्रभाग 09: शिव्हरी फंदे, प्रणाली लाजेवार, प्रभाग 10 : आपसाहेब गेडाम, भाग्यश्री बदुकले, प्रभाग 11 : जयश्री आगरकर, नितीन पंनसे, प्रभाग 12 : पूनम निंबोरकर, राहुल चौधरी भाजपने मोर्शीत स्थानिक पातळीवर सक्रिय, लोकसंपर्क मजबूत असलेल्या आणि सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. नगराध्यक्ष पदासाठी रेशमा उमाळे यांच्या नावाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. मोर्शीतील राजकीय वातावरणात या यादीमुळे नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत भाजप मजबूत तयारीने उतरल्याचे दिसून येत आहे.




