कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज द्या

जिल्ह्यातील केवळ 35 टक्के शेतकर्‍यांनाच नव्याने कर्ज

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्पष्ट निर्देश
पाणीटंचाई रोखण्यासह चारा आणि वीज नियोजनावर भर

अमरावती/14 ऑक्टोबर – कर्जमाफीच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत आणि लाभ मिळालेल्यांना पुन्हा शेतीसाठी कर्ज मिळावे, यासाठी सहकार विभागाने तातडीने पावले उचलावीत. राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या तिसर्‍या यादीत समाविष्ट सुमारे 12 हजार शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळवून देतानाच बँकांच्या माध्यमातून नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसाठ्याचे नियोजन, चारा लागवड, जलसंधारण, कालव्यांची दुरुस्ती आणि शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा यावरही संबंधित विभागांनी भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
कर्जमाफी मिळाल्यानंतरही अनेक शेतकर्‍यांना नव्याने कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 35 टक्के शेतकर्‍यांनाच पुन्हा कर्ज मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सहकार विभागाने संबंधित शेतकर्‍यांशी थेट संपर्क साधावा, बँकांना भेटी देऊन कर्जवाटपातील अडचणी दूर कराव्यात आणि पात्र शेतकर्‍यांना नव्याने कर्ज मिळवून

कर्जमुक्तीच्या तिसर्‍या यादीत 12 हजार शेतकरी
राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर झाली असून, त्यात सुमारे 12 हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. या शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी. कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा पीककर्ज मिळण्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी बँकांशी समन्वय साधून पात्र शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवावेत. जिल्ह्यातील केवळ 35 टक्के शेतकर्‍यांना नव्याने कर्ज मिळाल्याने उर्वरित पात्र शेतकर्‍यांपर्यंत कर्जसुविधा पोहोचविणे गरजेचे आहे.

Back to top button