जनरेटिव्ह एआय विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम

अमरावती /3 फेब्रुवारी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनच्या वतीने ओपन सोर्स कम्युनिटी व गुगल फॉर डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने जनरेटिव्ह एआय विषयावर नुकताच फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये प्रॉम्ट डिझाईन अॅन्ड प्रोटोटायपिंग (व्हर्टेक्स कोर), एसडीकेस अॅन्ड स्टुडिओ गेट स्टार्टेड, व्हिजन ट्रॉफिक मॉनिटरिंग अॅन्ड चॅलेंज लॅब (व्हर्टेक्स एआय) एडीके एजेंट अॅन्ड सव्र्हर मॅनेंजमेंट, व्हीएस कोड, क्लाऊड कॉन्सोल, फायरबेस होरस्टग अॅन्ड डिप्लोमेंट अशा आधुनिक जनरेटिव्ह एआय आधारित विषयांवर प्रात्यक्षिकाव्दारे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. श्री. आशुतोष एस. भाकरे, श्रीमती गीता काकाणी, श्री. सौरभ मिश्रा, श्री. जितेंद्र गुप्ता या वक्त्यांनी जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाची संकल्पना, त्याचे शैक्षणिक, संशोधन व तांत्रिक क्षेत्रातील उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष डेमो व केस स्टडीजमुळे सहभागी प्राध्यापकांना या तंत्रज्ञानाचा व्यवहार्य वापर समजून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमासाठी इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक प्रा. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव, व्यवस्थापक श्री अमोल हिरुळकर तसेच प्राईम सोल प्रायव्हेट लि. चे संचालक श्री सौरभ सिसोदिया यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे सहभागी शिक्षकांना जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळाले. एवढेच नाही, तर अध्यापन, संशोधन आणि नवोन्मेषाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व लाभदायक ठरल्याचे सहभागी प्राध्यापकांनी याप्रसंगी नमूद केले. कार्यक्रमाला विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापक मोठा संख्येने उपस्थित होते.




