मेळघाट मधिल कंत्राटी शिक्षकांचे बेमुदत कामबंद आंदोलन
अमरावती जिल्हा परिषद समोर शिशिर साबळे व पुजा मेहरे यांचे साखरी उपोषण सुरु

अमरावती/30मार्च : जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पेसा क्षेत्रातील सर्व कंत्राटी शिक्षक बेमुदत कामबंद व साखळी धरणे आंदोलन सोमवार 30मार्च पासुन अमरावती जिल्हा परिषद कार्यालय समोर सुरु झाले. आंदोलनाच्या पहील्या दिवशी शिशिर साबळे व पुजा मेहरे यांचे साखळी उपोषण सुरु झाले.
जिल्हा परिषद अमरावती पेसा क्षेत्रांतर्गत कार्यरत कंत्राटी शिक्षक अमरावती जिल्ह्यात अतिदुर्गम, आणि अति मागास क्षेत्रात शिक्षकांची पदभरती झालेली नसल्याने शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद अमरावती मार्फत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये ढएढ /उढएढ व ढ-खढ-2022 उत्तीर्ण पात्रता धारक उमेदवारांची पेसा क्षेत्राकरिता कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेली होती.त्यानुसार मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषद अमरावती द्वारा आदेशित पात्रता धारक कंत्राटी शिक्षक अति संवेदनशील, आणि अति मागास क्षेत्रात तुटपुंज्या मानधनावर आणि सहा सहा महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक समस्येला सामोरे जाऊन सुद्धा हुजर – तक्रार न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहोत. परंतु नुकताच दिनांक 11 फेब्रुवारी 2026 च्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार मा. सर्वोच्च न्यायालयाद्वारे पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचीकांवर सूचना देण्यात आल्या व त्यानुसार महाराष्ट्रात पेसा क्षेत्रातील एकूण पदांपैकी 50 टक्के पदे ही पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीस राखीव असून उर्वरित 50 टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरल्या जावीत असे उल्लेख आहेत. परंतु या नवीन शिक्षकांच्या पदभरतीमुळे या क्षेत्रात आजतागायत ज्या कंत्राटी शिक्षकांनी उपासमार सोसून प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यांच्यावर अन्याय होईल. त्यानुसार, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पेसा क्षेत्रातील 50 टक्के खुल्या प्रवर्गातून भरतीच्या मान्यते नुसार जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत शिक्षक पदांच्या जागा पोर्टल वर न देता, कार्यरत ढएढ/उखएढ व ढ-खढ 2022 पात्रता धारक कंत्राटी शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कायम रुजू करून सेवेत सामावून घ्यावे. व सर्व कंत्राटी शिक्षकांना शिक्षण सेवक पदावर न्याय मिळवून द्यावा.या प्रमुख मागण्या करिता दिनांक 30मार्च 2026 सोमवार पासून जिल्हा परिषद अमरावती समोर सर्व कंत्राटी शिक्षक बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन सुरु केले आहे.
या आदोलनात किशोर प्रकाश वानखडे,राहुल अंबादास सोनार,विशाल किशोरराव हगवणे, अविनाश सुरेशराव उदापुरे,मंगेश विश्वनाथ आठवले,सागर पद्माकर सूर्यवंशी,शितल गोपाल खडसे,दिपक गजानन मेमनकर,प्राजक्ता गणेश दातीर,अक्षय माणिक गजभिये,सचिन प्रकाश भालकर,संदीप हरिदास देशकर,राहुल दिलीपराव ठाकरे,रितेश अरुणराव शिंदे,सुप्रिया ओंकारराव गायकवाड,आश्विन गजानन मालवे, आशिष विनायक इंगळे,शिषीर महादेवराव साबळे,सिमाबानो मेहमूद शह, सरिता श्रीराम राऊत,देविदास जोगीलाल उईके,पार्वती अजाबराव पवार, शालिनी मनोहरराव बुराडे, मनोज हरिचंद्रराव पारीसे, कल्पना गिरीधर गोवारे, पूजा प्रकाश मेहरे,तेजस सुभाष चहाकार,प्रियंका दामोदर चोपडे,संजीवनी विठ्ठलराव कुकडे,संजीवनी ओंकारराव गायकवाड, निखिल महादेव चव्हाण, ज्योती महादेवराव मेश्राम, प्रफुल्ल साहेबराव पवार, पुजा सिंडाम यांचा सहभाग आहे.




