अमरावतीत 7500 लाभार्थ्यांना मिळाले शासकीय लाभ

मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी दिल्या आ.रवी राणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमरावती/28 एप्रिल : अमरावती तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरात तब्बल 7500 लाभार्थ्यांना 7 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली प्रदान करण्यात आला. आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने व मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या भव्य शिबिराने नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले.
या शिबिरामध्ये 57 शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवला. लाभार्थ्यांना 25 ट्रॅक्टर, 25 मिनी ट्रॅक्टर, 3200 पीआर कार्डे, 13 शिलाई मशीन, 32 पापड मशीन, 22 व्यायामशाळांचे अनुदान, 300 विहिरी, 600 लेक लाडकी योजनेचे लाभ, 500 शिधापत्रिका, 1200 संजय गांधी योजनेचे लाभ आणि 1220 आयुष्मान भारत कार्डे व 600 चष्म्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचल्याने नागरिक समाधानी दिसून आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार नवनीत राणा, उपमहापौर सचिन भेंडे, उपविभागीय अधिकारी अनिल ठाकरे, दादासाहेब दराडे, विजय लोखंडे, अक्षय मांडवे, तहसीलदार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भातकुल, राजेंद्र जाधव, बोरिकर, रासेकर, टीना राठोड, डॉ. गडकर, संदीप टाक, मोलाम, पिथो, संजय हिंगपुरे, योगेश पिथो, सोनाली नबले, मंगेश इंगोले, विनोद हनुमानदास जयस्वाल, सलिल खरोटे, आशिष कावरे, उमेश ढोणे, अजय घुले, विनोद गुहे, निलेश कुलकर्णी, सुरेश पाटील, नितीन मसगे, पराग चिमोटे, राजू हरणे, ज्ञानेश्वर राठोड व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रशासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button