अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, शरद पवारांचाच प्लॅन

अमरावती/28 डिसेंबर -राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहणार्या बारा मतीमध्ये आज एका विशेष कार्य क्रमाच्या निमि त्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम अदानी एकत्र पाहायला मिळाले. या कौटुंबिक आणि राजकीय भेटीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे. पवार कुटुंबियांच्या या एकत्र येण्यावर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या की, अजित पवार भाजपसोबत गेले, ही शरद पवारांचीच इच्छा होती. त्यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व घडले आहे. राणा यांनी जुन्या संदर्भांचा दाखला देत म्हटले की, पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्याच नियोजनाचा भाग होता. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन निवडणूक लढवणे आणि मंत्रिपदाची शपथ घेणे, हे सर्व चित्र शरद पवारांनीच तयार केले. आज बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसले, यात नवल वाटण्यासारखे काही नाही, कारण मुळात हे सर्व पवारांच्याच संमतीने सुरू आहे.




