कोंडेश्वर येथे मुंबईसारखे अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारणार

चिखलदरा स्कायवॉक बेलोरा विमानतळाच्या कामाला वेग

प्रशासकीय सुलभतेसाठी नवीन कार्यालयांच्या निर्मितीला मंजुरी

अमरावती /20 मे- मुंबईच्या धर्तीवर अमरावतीच्या कोंडेश्वर येथे अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रालय स्तरावर घेण्यात आला आहे. विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. रवि राणा यांच्या पुढाकारातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अमरावती जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन, दळणवळण आणि प्रशासकीय विभागांच्या प्रलंबित मागण्यांना मंजुरी देण्यात आली.या बैठकीत अमरावती विमानतळावर रात्रीच्या विमान उड्डाणासाठी आवश्यक दिव्यांची व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे जिल्ह्यात लवकरच चोवीस तास विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच चिखलदरा येथील बहुप्रतीक्षित स्कायवॉक प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यावर चर्चा झाली.
प्रशासकीय सुलभतेसाठी अचलपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास, अमरावती शहर व ग्रामीण तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यास आणि चूर्णी येथे नवीन तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यास महसूल मंत्र्यांनी मंजुरी दिली. याशिवाय जिल्ह्यात माहिती तंत्रज्ञान केंद्र, विमान चालक प्रशिक्षण केंद्र आणि वस्त्रोद्योग केंद्र उभारणीचा सविस्तर आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामास्वामी, आयुक्त श्रीमती देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले आणि खाजगी सचिव प्रवीण महाजन उपस्थित होते.- मुंबईच्या धर्तीवर अमरावतीच्या कोंडेश्वर येथे अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रालय स्तरावर घेण्यात आला आहे. विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. रवि राणा यांच्या पुढाकारातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अमरावती जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन, दळणवळण आणि प्रशासकीय विभागांच्या प्रलंबित मागण्यांना मंजुरी देण्यात आली.या बैठकीत अमरावती विमानतळावर रात्रीच्या विमान उड्डाणासाठी आवश्यक दिव्यांची व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे जिल्ह्यात लवकरच चोवीस तास विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच चिखलदरा येथील बहुप्रतीक्षित स्कायवॉक प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यावर चर्चा झाली.
प्रशासकीय सुलभतेसाठी अचलपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास, अमरावती शहर व ग्रामीण तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यास आणि चूर्णी येथे नवीन तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यास महसूल मंत्र्यांनी मंजुरी दिली. याशिवाय जिल्ह्यात माहिती तंत्रज्ञान केंद्र, विमान चालक प्रशिक्षण केंद्र आणि वस्त्रोद्योग केंद्र उभारणीचा सविस्तर आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामास्वामी, आयुक्त श्रीमती देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले आणि खाजगी सचिव प्रवीण महाजन उपस्थित होते.

प्रशासकीय क्रांती आणि रोजगार निर्मिती

अमरावतीत मत्स्यव्यवसाय केंद्राच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. तसेच अचलपूर, चूर्णी येथील नवीन कार्यालयांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कामे गतीमान होतील.

संबंधित बातम्या

Back to top button