सुनिता दीदी मल्होत्रा यांच्यातर्फे तपोवनला एक लाख रुपयांची देणगी

अमरावती /4 फेब्रुवारी : पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनच्या ज्येष्ठ विश्वस्त भगवंत सिंह दलावरी यांच्या सहकारी सुनिता दीदी मल्होत्रा यांनी आपल्या वीस सहकार्‍यांसह तपोवला नुकतीच भेट देऊन एक लक्ष रुपयाची देणगी प्रदान केली. दिल्ली निवासी सुनिता दीदी मल्होत्रा या भगवंतसिंह दलावर यांच्या सहकारी म्हणून मागील 25 वर वर्षापासून विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनशी जुळले आहेत. नुकतेच भगवंतसिंह दलावरी उर्फ पापाजी यांचे दिल्ली येथे अल्पशा आजाराने वृद्धपकाळाने निधन झाले. त्यानंतर तपोवन संस्थेला सदिच्छा भेट आणि तपोवनातील निवासी लोकांना स्नेहभोजन देण्यासाठी आपल्या 20 सहकार्‍यांसह सुनीता दीदी दोन दिवसाच्या भेटीसाठी तपोवनत आल्या होत्या. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संस्थेच्या होत असलेल्या विकास व कार्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन मधील रुग्ण कार्यकर्ते विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा त्यांच्यासाठी करण्यात येणार्‍या सोयी बघून सुनीता दीदींनी आपल्या सहकारी भारावून गेले. यावेळी त्यांच्या सहकारी हरिंदर सिंग अरविंद कौर कवरजीत कौर सिमरन प्रीता सिंग सुखदेव कौर पी एस सोनी प्रवीण सारायकर इंदुताई सरायकर शालिनी जारी हेमंत लोथे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपेक्षित होते.

संबंधित बातम्या

Back to top button