मातोश्रीला तात्पुरते तुरुंग बनवण्याची योजना होती

मुंबई– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्या नंतर त्यांच्या मातोश्री निवासस्थानालाच तात्पुरते तुरुंग घोषित करण्याची सरकारची योजना होती, असा मोठा गौप्य्स्फोाट ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यामुळे निवृत्त आयपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी यांच्यातील शाब्दिक युद्ध आता एका नव्या वळणावर आले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली बाजू स्पष्ट केली. भुजबळ म्हणाले, ठाकरेंच्या विरोधातील फाईल ही तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एन. सिंग यांनीच पाठवली होती. ही पूर्णपणे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर आधारित कायदेशीर प्रक्रिया होती, त्यामुळे वैयक्तिक दबावाचा प्रश्नच येत नाही. याबाबत पोलीस आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की बाळासाहेबांना कोणताही त्रास होऊ नये. पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करू नये, असेही सांगण्यात आले होते.

Back to top button