हवाई उड्डाण अचानक रद्द

मंत्री गुलाबराव पाटील निघाले कारने

लातूर/4 फेब्रुवारीराज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नेतेमंडळी विविध भागात प्रचाराला जात आहेत. काही मंत्री विमानाने सभा स्थळी जात आहेत. याच दरम्यान काही दिवसां पूर्वी पंकजा मुंडे यांच्या विमा नात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटलांचं हवाई उड्डाण अचानक रद्द करण्यात आलं. त्यानंतर रस्तेमार्गे कारने पुढच्या दिशेला निघाले. मंत्री गुलाबाव पाटील हे लातूर दौर्‍यावर आहेत. ते लातूरवरून विमानाने छत्रपती संभाजीनगरला जाणार होते. या प्रवासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण तयारी केली. परंतु त्यांच्या विमानाला लातूरमध्ये क्लिअरनेस मिळाला नाही. त्यामुळे त्यांना अचानक कारने छत्रपती संभाजीनगरला जावे लागले. खरंतर त्यांच्या विमानाने दोन वेळेस उड्डाण घेतले होते. परंतु क्लिअरनेस मिळत नसल्याने उड्डाण रद्द करण्यात आलं. एव्हिएशन कंपनीचे सहा आसन क्षमतेचं हे विमान होतं. हैदराबाद ,बिदर आणि चेन्नई या ठिकाणावरून क्लिअरन्स आला नसल्यामुळे लातूर विमानतळावरून उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे लातूर विमानतळावरून साडेचारच्या दरम्यान उड्डाण करणार होते.

संबंधित बातम्या

Back to top button