शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही

दुष्काळाच्या उपाययोजनांची तयारी सुरू

देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई /15 सप्टेंबर : यंदाच्या मान्सूनमध्ये ‘एल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी आणि असमान पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाईच्या व दुष्काळाच्या उपाययोजनाची तयारी सुरू केल्याच माहिती दिली आङे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जी परिस्थिती आहे, ती समाधानकारक नाही, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे खरं आहे की राज्यामध्ये पावसाची परिस्थिती फार ताणाची आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा ताण 30 दिवसांवर गेलेला आहे. त्या गोष्टीकडे सरकार पूर्ण लक्ष ठेवून आहे. आजही मंत्रिमंडळामध्ये जवळपास अर्धा पाऊणतास त्याच विषयावर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यातलं सादरीकरण झालं. कुठल्या तालुक्यात काय परिस्थिती आहे? पावसाचा खंड किती आहे? या संदर्भातली सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे आणि या संदर्भात ज्या काहीआपल्याला टंचाईच्या व दुष्काळाच्या उपाययोजना कराव्या लागतात आणि त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे.
आपल्याला कल्पना आहे की, एनडीआरएफच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्व्हे करावा लागतो, तो 5 ऑक्टोबरनंतर करावा लागतो. त्याच्या आधीचा सर्वे हा मदती करता पात्र होत नाही. पण आपण 5 ऑक्टोबर करता न थांबता बाकी उपाययोजनाची प्राथमिक माहिती घेण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबरपासून जो ऑफिशियल सर्व्हे आहे, तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू आणि कुठल्याही शेतकर्‍यांना आम्ही वार्‍यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकतीने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकर्‍यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे, ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे आणि त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे. त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Back to top button