उदय सामंत यांच्या सहीचा पुन्हा वापर

मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नावाने बनावट लेटर हेडचा वापर करून तसेच बनावट सह्या व शिक्के वापरून जिल्हा नियोजन समितीकडून निधी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी समोर आला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान उदय सामंत यांच्या नावाने विधानभवनाचे पास विकल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा उदय सामंत यांच्या नावाने विधानभवनाचे पासेस विकल्याचा प्रकार उदय सामंत यांनी स्वत: समोर आणला आहे. विधान परिषदेत उदय सामंत म्हणाले की, मला एका गंभीर विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button