मनोज जरांगे यांना गोळ्या जीवे मारण्याची धमकी

बीड /4 फेब्रुवारी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना गोळ्या घालून मारतो अशी धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सध्या बीडमध्ये व्हायरल होत आहे. दारू प्यायल्यानंतर एकाने जरांगे समर्थकाला फोन करत ही धमकी दिली. त्यामध्ये त्याने धनंजय मुंडे यांचेही नाव घेतल्याचं समोर आलं. बीडमध्ये व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली. एका मद्यपीकडून थेट मनोज जरांगे पाटील यांनाच गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार प्राप्त नाही. ऑडिओ हा बीडचा आहे की आणखीन कुठल्या जिल्ह्यातला हेही स्पष्ट होत नाही. व्हायरल होणार्या ऑडिओ क्लिपमध्ये एका मद्यपीने दुसर्या व्यक्तीला कॉल केला.




