यंदा आनंदाचा शिधा मिळणे अशक्य
अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

* लाडकी बहीण योजनेचा फटका
मुंबई /5 ऑगस्ट : लाडकी बहीण योजनेमूळे राज्याच्या तिजोरी फटका बसला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देण्यात येतात. मात्र यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामूळे सरकार आनंदाचा शिधा देऊ शकणार नाही, अस राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात राज्यातील गरीबांना केवळ 100 रुपयांमध्ये चार वस्तू आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. मात्र लाडकी बहीण योजनेचा फटका आता आनंदाचा शिधा योजनेला बसणार असून यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी कबूली छगन भुजबळांनी दिली आहे. मुंबई पर्यटन महायुतीकडून विधानभेच्या निवडणुकीआधी जाहिर केलेल्या लाडकी बहिण योजनेमूळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत आहे, अनेक खात्याचा निधी हा बहिणींचे पैसे देण्यासाठी वापरला जात आहे. यावरटच बोलताना भुजबळ म्हणाले आम्ही आता राज्य सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या योजनांच्या निधी बाबत मागेपुढे होतं असलं तरी आम्ही निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू असंही छगन भुजबळ म्हणाले. एकदम 45 हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी द्यावे लागणार असल्याने त्याचा परिणाम इतर योजनांवर थोडा थोडा होत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
*आता टेंडर काढणे शक्य नाही
छगन भुजबळ म्हणाले की, आनंदाचा शिधा द्यायचा असेल तर त्यासाठी दोन ते तीन महिने आधी टेंडर काढावे लागते. आता तरी हे शक्यत नाही. आनंदाचा शिधा आत्ता मिळणार नाहीत. त्यासाठी टेंडर काढाव लागतं त्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी लागतो. आता तरी हे शक्य नाही. वर्षाला शिवभोजन थाळी साठी 140 कोटी रुपये तर आनंदचा शिधा साठी 550 कोटी रुपये लागत होते, अस ते म्हणाले.




