अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू, राज्यात तीन दिवसांचा दुखावटा जाहीर

आज बारामतीत अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार

अजितदादांचा मृत्यू हा अपघात; राजकारण आणू नये-शरद पवार

बारामती /28 जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 66 व्या वर्षी ’दादां’नी जगाचा निरोप घेतल्याने राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी (28 जानेवारी) लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांची बुधवारी बारामतीमध्ये सभा होती. या अपघातात सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते. सकाळी 8.46 दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या महासागरात बुडाला आहे. डीजीसीएने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानात होते. त्यांच्यासोबत इतर दोन लोक म्हणजे एक पीएसओ आणि एक अटेंडंट तसेच दोन क्रू मेंबर्सही होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, अपघातात विमानातील कोणीही वाचले नाही. दरम्यान, राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. बुधवारी अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौर्‍यासाठी ते सकाळी बारामतीसाठी प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी आम्ही पोरके झाल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, प्रफुल पटेल यांनाही माहिती कळताच अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले.
विमान अपघातात यांचा मृत्यू-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अंगरक्षक विदीप जाधव, पिंकी माळी तसेच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे.
विमान कोसळल्यानंतरही स्फोट -एका बाजूने झुकलेलं हे विमान एका शेतात जाऊन कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. स्फोट होतच विमान खाली कोसळत असल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विमान जमीनीवर पडल्यानंतरही स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जाईल.

अपघाताच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ समोर

विमान हवेत झुकले आणि जमिनीवर आदळताच आगीच्या गोळ्यात अडकले बारामती- आज महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री आणि तळागाळातील नेते अजित पवार यांना गमावले. अजित पवार सकाळी 8:15 वाजता बारामतीला निघाले. विमान सकाळी 8:45 वाजता बारामतीत उतरणार होते. विमान वेळेवर बारामतीत पोहोचले, परंतु लँडिंगच्या अगदी आधी अजित पवार यांचे विमान कोसळले. विमान धावपट्टीवरून एका खड्ड्यात कोसळले आणि अनेक स्फोट झाले. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये विमान कोसळताना दिसत आहे. अजित पवार यांचे विमान कसे कोसळले हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवले आहे. त्यात विमान प्रथम हवेत झुकताना आणि नंतर जमिनीवर आदळताना स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की विमान उतरताच ते आगीच्या गोळ्यात अडकले. अजित पवार आज चार निवडणूक सभांना उपस्थित राहण्यासाठी बारामतीला जात होते. त्यांचे विमान सकाळी 8:10 वाजता मुंबईहून उड्डाण केले. एटीसीनुसार, विमानाचा संपर्क सकाळी 8:18 वाजता झाला. त्यावेळी, पायलटला धावपट्टी दिसत नव्हती, म्हणजेच पहिला लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. पायलटने पुढचा प्रयत्न केला. सकाळी 8:43 वाजता, पायलटला धावपट्टी दिसली. एटीसीने लँडिंगची परवानगी दिली आणि अवघ्या सहा सेकंदात विमान कोसळले.

संबंधित बातम्या

Back to top button