लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाभ

मुंबई– ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हप्ता न आल्यानं लाडक्या बहिणी संतप्त झाल्या होत्या. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी महिलांनी आंदोलनं केली. बुलढाण्यातील संतप्त लाडक्या बहिणींनी 19 जानेवारीला महिला बाल कल्याण कार्यलयातच ठिय्या मांडला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 20 जानेवारीला रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. या आंदोलनांची दखल घेत महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकार्‍यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली.

संबंधित बातम्या

Back to top button