लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल

मुंबई/12 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा 16 वा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता केला जाणार आहे. मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार असल्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. गेल्या महिन्याभरापासून ई केवायसी करताना मोठा अडचणी येत होत्या. कधी सर्वर डाऊन, कधी ओटीपी न येणे अशा समस्यांमुळे महिला मेटाकुटीला आल्या होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरेंनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि ई केवायसीसाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.




