राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
मुंबई/9 ऑक्टोबर : मागच्या कॅबिनेट सबकमिटीमध्ये 18 तालुक्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यावर 20 टक्के ग्राउंड ट्रूथिंग सर्वेक्षण करावं आणि दुष्काळाच्या यादीमध्ये यांचाही समावेश घेऊ ग्राउंड ट्रूथिंग करता येऊ शकतो, असा शासन निर्णय मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने आज आपण काढलेला आहे. सोबतच 18 तालुक्यांची पुन्हा एक यादी आली आहे, त्यावर अहवाल मागितलेला आहे. अहवाल आल्यानंतर त्याचाही ग्राउंड ट्रूथिंग करू आणि त्यावर निर्णय घेऊ. असे महत्वाचं विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोबतच 36 तालुके या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षणासाठी आम्ही पाठवले आहेत. 265 पैकी आणखी 36 तालुके हे कॅबिनेट सबकमिटीमध्ये आले आहेत, माझ्याही प्रवासात याबद्दलचे निवेदन आले होते. लोकप्रतिनिधी बांधावर गेले होते या सर्वांनी शिफारशी केल्या होत्या. या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारचे दुष्काळ पथक महाराष्ट्रातील परिस्थितीची पाहणी करत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळाची दखल घेतली आहे असून तातडीने पथक पाठवले आहे. या तीनही टीम महाराष्ट्राचे सर्वेक्षण करतील. मला विश्वास आहे की पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री यांच्या प्रयत्नांनी एक मोठा सपोर्ट महाराष्ट्राला मिळेल, असेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विधान परिषद निवडणूकीतील बंडखोरी बाबत बोलायचं झालं तर, आमचा प्रयत्न आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणुकीत बंडखोरी करू नये, असा आमचा प्रयत्न आहे. त्या उपरही बंडखोरी झाली तर त्यांच्याबद्दल काय चर्चा करायची, काय निर्णय घ्यायचा, याबद्दलच्या सर्व अधिकार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आहेत, ते घेतील असेही ते म्हणाले.





